बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मियामी , सोमवार, 26 मार्च 2018 (13:18 IST)

फेडररने जागतिक अग्रानामांकन गमावलेे

स्वीस खेळाडू व जगात अग्रस्थानी असलेल्या रॉजर फेडररला जागतिक टेनिसधील एक क्रमांक गमवावा लागला.
 
मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिाचा क्वॉलिफायर थानसी कोकीनाकीस याने दुसर्‍या फेरीत फेडररला पराभूत केले. कोकीनाकीसने 3-6, 6-3, 7-6 (7-4) अशा तीन सेटच्या संघर्षानंतर फेडररवर मात केली. या पराभवानंतर फेडररने या वर्षी या हंगामात क्ले कोर्टवरील टेनिस स्पर्धा खेळणार नाही, असा निर्णय घेतला आहे. 
 
फेडररने 20 ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. जानेवारीत खेळली गेलेली ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकल्यामुळे तो जगात अव्वलस्थानी आला होता; परंतु या पराभवानंतर त्याचे अग्रस्थान राफेल नदालकडे जाणार आहे. लागोपाठ दुसर्‍यावर्षी फेडरर हा क्ले  कोर्ट स्पर्धा खेळण्याचा हंगाम सोडून देत आहे.