बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 17 जुलै 2017 (10:21 IST)

विम्बल्डन : रॉजर फेडरर अजिंक्य , सर्वाधिक वेळा स्पर्धा जिंकली

ग्रासकोर्टचा बादशाह अशी बिरुदावली मिरवणाऱ्या रॉजर फेडररने विम्बल्डनमध्ये पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये क्रोएशियाच्या मरिन सिलिचवर मात करुन फेडररने आठव्यांदा विजेतेपद पटकावले.ही स्पर्धा जिंकत फेडररने विम्बल्डन स्पर्धेचा ताज सर्वाधिक वेळा मिळवण्याचा विक्रम रचला आहे.यापूर्वी पीट सॅम्प्रसच्या सात वेळा विम्बल्डन जिंकण्याच्या विक्रमाशी फेडररने बरोबरी केली होती. मात्र आठवे विजेतेपद पटकावून त्याने सॅम्प्रसचा विक्रम मोडित काढला आहे.फेडररने अकराव्यांदा विम्बल्डनची फायनल गाठली आहे. 2012 नंतर पाच वर्षांनी त्याला विम्बल्डनचं जेतेपद मिळाले आहे. तर फेडरर खेळत असलेली ही 29 वी ग्रॅंडस्लॅम फायनल आहे.विम्बल्डनची अंतिम फेरी खेळणारा फेडरर हा दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. फेडरर 35 वर्षांचा आहे. यापूर्वी केन रोसवेलने 39 व्या वर्षी विम्बल्डनची फायनल खेळली होती. तर विम्बल्डनची अंतिम फेरी गाठणारा क्रोएशियाचा हा दुसराच खेळाडू आहे.