बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 24 मार्च 2018 (16:38 IST)

आजपासून पुणे येथे शरीरसौष्ठव भारत श्री स्पर्धा

दोन दिवस ‘भारत श्री’शरीरसौष्ठव स्पर्धेचा धमाका पुणे येथे क्रीडाप्रेमींना पाहायला मिळणार आहे. भारतातील सर्वात यशस्वी खेळाडू बालेवाडीतील बॉक्सिंग हॉलमध्ये पीळदार स्नायूंच्या पोजिंग युद्धासाठी तयार झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्राचा सुनीत जाधव जेतेपदाची हॅटट्रिक साजरी करतो की या स्पर्धेला नवा विजेता मिळतो याकडे तमाम शरीरसौष्ठवपटूंच्या नजरा लागल्या आहेत. बालेवाडीत शरीरसौष्ठव स्पर्धेच्या इतिहासात अनेक विक्रम मोडले जातील असा अंदाज आहे. या स्पर्धेसाठी विक्रमी संख्येने खेळाडू आज पुण्यात दाखल झाले आहेत. स्पर्धा जिंकून हॅटट्रिकसाठी सज्ज असलेल्या सुनीत जाधवला जेतेपद राखण्यासाठी सर्वस्व पणाला लावावे लागणार असून महाराष्ट्राच्या महेंद्र पगडेकडूनही त्याला जोरदार स्पर्धा निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या संघात सागर कातुर्डे, नितीन म्हात्रे, महेंद्र चव्हाण, अक्षय मोगरकर आणि अतुल आंब्रे हे संभाव्य पदक विजेतेही खेळाडू आहेत. रेल्वेच्या जावेद खानकडूनही बऱ्याच अपेक्षा आहेत.