बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: वेल्स , सोमवार, 5 मार्च 2018 (11:16 IST)

टेनिस स्पर्धांतून नदालची माघार

स्पेनचा द्वितीय मानांकित टेनिसपटू राफेल नदालच्या पायाला दुखापत झाली असून आगामी इंडियन वेल्स व मियामी खुल्या टेनिस स्पर्धांमधून माघार घेतली आहे. गेल्या जानेवारीत नदालला ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेतून दुखापतीमुळे बाहेर पडावे लागले होते.
 
नदालने आतापर्यंत तीनवेळा इंडियन वेल्स स्पर्धा जिंकली असून पाचवेळा मियामी स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे. मेक्सिकन खुल्या टेनिस स्पर्धेलाही नदालला मुकावे लागले आहे. इंडियन वेल्समधील ही स्पर्धा पुढील आठवडय़ात तर मियामी टेनिस स्पर्धा मार्चच्या तिसऱया आठवडय़ात सुरू होणार आहे.