बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 14 जून 2017 (11:28 IST)

“क्‍ले-कोर्टच्या बादशहा’अर्थात राफेल नदालची आकर्षक पोझ…

“क्‍ले-कोर्टच्या बादशहा’ अर्थात राफेल नदाल  याने फ्रेंच ओपन ट्रॉफी हात घेऊन पॅरिसमधील जगप्रसिद्ध आयफेल टॉवर येथे अतिशय सुंदर अशी पोझ दिली. “राफा’, “लाल मातीचा सम्राट” आणि टेनिस विश्‍वाचा सध्याचा सर्वात अनुभवी अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखल्या जात असलेल्या “राफा’ अर्थात राफेल नदाल  याने दहाव्यांदा फेंच ओपन टेनिस स्पर्धा जिंकत “भुतो न भविष्यती’ अशी कामगिरी केली आहे.  येथील फिल्प कार्टीयर कोर्टवर “राफा’ने स्वित्झर्लंडच्या स्टॅन वॉवरिंकाचा 6-2, 6-3, 6-1 असा सरळ सेटमध्ये धुव्वा उडवत विश्‍वविक्रमी कामगिरी नोंदवली.