शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मियामी , गुरूवार, 22 मार्च 2018 (15:22 IST)

मियामी खुले टेनिस : टीनऐजर अनिसिमोव्हा विजयी

अमेरिकेची टीनएजर टेनिस खेळाडू आमांडा अनिसिमोव्हा हिने मियामी ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत वांग क्विआंग हिचा खळबळजनक पराभव केला.
 
अनिसिमोव्हाने चीनच्या क्विआंग हिचा 6-3, 1-6, 6-2 अशा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला आणि
दुसरी फेरी गाठली. दुसर फेरीत ती स्पेनच्या जगात तिसर्‍या स्थानावर असलेल्या गर्बिने मुगुरुझा हिच्याविरुध्द खेळेल. अनिसिमोव्हाने नुकत्याच पार पडलेल्या इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेतही चांगली कामगिरी केली होती. ती 16 वर्षाची असून तिला थेट प्रवेश मिळाला आहे. बीएनपी परिबास ओपन स्पर्धेत या महिन्यापर्यंत तिला मुख्य फेरीत कधीच प्रवेश मिळाला नव्हता. त्या स्पर्धेत तिने चौथी फेरी गाठली. जगात 53 व्या स्थानावर असलेल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव केला.
 
तिने या सामन्यामध्ये प्रतिस्पर्धी क्विआंगला सहा दुहेरी चुका करण्यास भाग पाडले. हा सामना 98 मिनिटे खेळला गेला.
 
अनिसिमोव्हा ही जगात 130व्या स्थानी आहे. तर मुगुरुझा ही विम्बल्डन विजेती असून ती तिसर्‍या स्थानावर आहे. या सामन्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. ब्राझीलची ब्रिट्रीज हदाद हिने ब्रिटनच्या हिदेर वॅटसन हिच्यावर 7-6 (3), 6-2 अशी मात केली. वॅटसनने पहिल्या सेटमध्ये सर्व्हिस करताना गुण मिळविण्याची संधी मिळवली.