बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 9 एप्रिल 2018 (11:40 IST)

राष्ट्रकुल स्पर्धा : नेमबाजीत मेहुली घोषला रौप्य, अपूर्वी चंदेलाला कांस्यपदक

गोल्ड कोस्ट : २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा दबदबा कायम आहे. महिलांच्या १० मीटर्स एअर रायफल प्रकारात भारताला दुहेरी यश मिळाले. मेहुली घोषने रौप्य, तर अपूर्वी चंदेलाने कांस्यपदक पटकावले.
 
मेहुली आणि सिंगापूरच्या मार्टिना वेलोसो यांनी अंतिम फेरीत २४७.२ अशा सारख्याच गुणांची कमाई केली होती. मात्र शूट ऑफमध्ये मार्टिनाने बाजी मारुन सुवर्ण पटकावलं. अपूर्वीने २२५.३ गुण मिळवून कांस्य मिळवले.
 
पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्टल प्रकारात जीतू रायने सुवर्णपदक पटकावले, तर ओम मिथरवाल याला कांस्यपदक मिळाले. नेमबाजीत आज पाचव्या दिवशी भारताला एकूण ४ पदक मिळाली.