1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017 (11:08 IST)

नोटाबंदीनंतर २६०० किलो सोने आणि चांदी पकडली

notebandi gold and silver
नोटाबंदीच्या एक वर्षभरात देशातील विमानतळांवरून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) ८७ कोटी रूपयांची रोकड व २६०० किलो सोने आणि चांदी पकडली आहे. सीआयएसएफकडे देशातील ५९ विमानतळांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. 
 
सीआयएसएफच्या आकडेवारीनुसार ८ नोव्हेंबर २०१६ ते ७ नोव्हेंबर २०१७ पर्यंत ८१.१७ कोटी रूपयांची संशयित रोकड त्याचबरोबर १४९१.५ किलो सोने आणि ५७२.६३ किलो चांदी मिळून आली आहे. सर्वाधिक ३३ कोटी रूपये मुंबईच्या विमातळावरून जप्त करण्यात आले. तर सर्वाधिक ४९८ किलो सोने हे दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जप्त करण्यात आले. तर २६६ किलो चांदी हे जयपूर विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले.