मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

नोटाबंदी आणि जीएसटी नंतर काय होईल मोदी सरकारचे पुढील पाऊल ...

नोटाबंदी आणि जीएसटी नंतर मोदी सरकार एक अजून मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. असे सांगण्यात येत आहे की हे अभियान अनामित मालमत्तेच्या  विरोधात राहणार आहे.  
 
सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार सरकार अनामित मालमत्तेच्या विरोधात लवकरच  मोठे अभियान सुरू करू शकते. येणार्‍या दिवसांमध्ये मालिकाना हक्काचे कायदेशीर पुरावा न मिळाल्यानंतर सरकार अनामित मालमत्ता कब्ज्यात घेऊ शकते. कब्ज्यात घेणार्‍या संपत्तींना गरिबांना एखाद्या योजनेशी जोडण्यात येऊ शकते.  
 
महत्त्वाचे म्हणजे नुकतेच गुजरात आणि हिमाचल प्रदेशात बर्‍याच जागेवर रॅलीत पंतप्रधान मोदी यांनी अनामित मालमत्तेच्या बहाणे विरोधकांवर वार केला आहे.  
 
8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर भाजप याला कालाधन विरोधी दिवस साजरा करण्याच्या तयारीत आहे. या दिवशी भाजप नोटाबंदीच्या फायद्याला सांगण्याचा प्रयत्न करेल तर विरोधी या दिवशी नोटाबंदीच्या विरोधात देशभरात विरोध प्रदर्शन करणार आहे.