रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017 (11:02 IST)

एअरटेलची सेलकॉनशी भागीदारी

रिलायन्स जिओच्या स्मार्टफोनला टक्‍कर देण्यासाठी सुनील भारती संचलित भारती एअरटेलने सेलकॉन या स्मार्टफोन उत्पादक कंपनीबरोबर भागीदारी केली. मेरा पहला 4जी स्मार्टफोन या योजनेंतर्गत कंपनीकडून 1,349 रुपयांत 4जी स्मार्टफोन दाखल करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांत ग्राहकांना परवडतील अशा दरांत 4जी स्मार्टफोन कंपन्यांकडून सादर करण्यात येत आहेत.
 
एअरटेलचा हा दुसरा किफायतशीर दरातील स्मार्टफोन असणार आहे. कंपनीने यापूर्वी कार्बनबरोबर भागीदारी केली आहे. नवीन ऑफरमध्ये सेलकॉन स्मार्ट 4जी या फोनची इफेक्‍टिव्ह किंमत 1,349 रुपये असली तरी ग्राहकांनी 2,849 रुपयांचे डाऊन पेमेंट करावे लागेल. यासाठी 36 महिन्यांपर्यंत 169 रुपयांचे मासिक रिचार्ज करावे लागेल.
18 महिन्यानंतर ग्राहकांनी 500 रुपयांचा कॅशबॅक देण्यात येईल आणि उर्वरित 1000 रुपये 36 महिन्यांनंतर मिळतील. अशा प्रकारे 36 महिन्याने ग्राहकांना 1500 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.
 
ऑफलाईन बाजारात या फोनची किंमत 3500 रुपये आहे. हा फुल टचस्क्रीन फोन असून त्यामध्ये ड्युअल सिमची सेवा आहे. गुगल प्ले स्टोअरमधील सर्व अॅप सपोर्ट करतील.