तेलातील तेजीमुळे भारताचा बोनस संकटात
भारतीय अर्थव्यवस्थेला गेले काही वर्षे सर्वाधिक मदत कोणी केली असेल तर ती इंधनाच्या किमतीने. त्या आवाक्यात राहिल्याने भारताचा आयातीवरील खर्च मर्यादित राहिला, ज्यामुळे आयात निर्यात व्यापारातील तूट आवाक्यात राहिली. भारताला सर्वाधिक आयात खर्च इंधनावर होतो. तो कमी झाल्याने भारतीय रिझर्व बॅंकेतील परकीय चलनाचा अर्थात डॉलरचा साठा विक्रमी 400 अब्ज डॉलरपर्यंत जाऊ शकला, पण आता इंधनाचे दर वाढू लागल्याने भारतीय अर्थव्यवस्थेला तो बोनस गमवावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.