शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

स्वित्झर्लंडमधल्या नाल्यांमधून वाहते सोने-चांदी

झुरिच- पूर्वी भारतात सोन्याचा धूर वाहायचा असे आपले पूर्वज सांगतात. पण जर तुम्हाला कोणी सांगितले की नाल्यातून खरचं सोने वाहते तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल पण हे खरच आहे. स्वित्झर्लंडमधील एका नाल्यात खरच सोन्या- चांदीचे कण वाहतात.
 
रॉयटर्सच्या वृत्तानुसार एका संशोधनातून हे समोर आले आहे की तेथील नाल्यांमध्ये सोने आणि चांदी सापडले आहे. ज्याची किंमत जवळपास 20 कोटींएवढी असू शकते. स्वित्झर्लंडमधील जलसंशोधकांनी गेल्यावर्षी एक संशोधन केले होते. त्याद्वारे त्यांना तेथील नाल्यांमध्ये तीन टन चांदी आणि 43 किलो सोने सापडले होते. त्यावर त्यांनी अधिक अभ्यास केला. त्यातून असे सिद्ध झाले आहे की तेथील नाल्यांमधून हे सोन-चांदी नेहमी सापडते.
 
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोण टाकत असेल एवढे सोने-चांदी? अभ्यासकांनी याची उकल करून देताना सांगितले आहे की ज्या नाल्यांमधून हे सोने सापडले आहे त्या भागात अनेक कारखाने आहेत.