शनिवार, 6 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 30 मार्च 2018 (14:17 IST)

राष्ट्रकुल संस्मरणीय करणार : सायना

SAINA NEHWAL
भारताच्या सायना नेहवालला मागील काही स्पर्धांत चमकदार कामगिरी करता आलेली नाही; पण गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत तिला 2010च्या स्पर्धेतील कामगिरीची पुनरावृत्ती करायची आहे.
 
सायना म्हणाली, नवी दिल्लीत झालेल्या 2010 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत पदकतक्त्यात भारत दुसर्‍या स्थानावर राहिला. या स्पर्धेचा शेवटचा दिवस शिल्लक होता आणि भारताने 99 पदके जिंकली होती. शेवटच्या दिवशी भारतीय पुरुषसंघाची अंतिम लढत आणि बॅडमिंटन महिला एकेरीची अंतिम लढत होती.
 
मी सुवर्णपदक जिंकले आणि हॉकी संघाने रौप्यपदक. सुवर्णपदक जिंकून शंभरावे पदक भारताच्या खात्यात जमा करू शकले, याचा आनंद आहे.' त्या वेळी सायना अवघ्या 20 वर्षांची होती. त्या वेळी ती राष्ट्रकुल स्पर्धेत महिला एकेरीत सुवर्णपदक जिंकणारी पहिलीच भारतीय बॅडमिंटनपटू ठरली होती.
 
त्याचबरोबर तिच्या सुवर्णपदकाने भारताने (38 सुवर्ण) पदकतक्त्यात इग्लंडला (37 सुवर्ण) मागे टाकून दुसरा क्रमांक मिळवला. त्यामुळे 2010च्या स्पर्धेच्या आठवणी कधीही विसरणार नाही, असे सायना म्हणाली.