जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, साई प्रणीथ यांची विजयी सलामी

ग्लासगो| Last Modified बुधवार, 23 ऑगस्ट 2017 (11:34 IST)
भारताची ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि सिंगापूर ओपन विजेता पुरुष खेळाडू बी. साई प्रणीथ यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करताना जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. तसेच प्रणव चोप्रा व सिक्‍की रेड्डी यांनीही मिश्र दुहेरीत दुसऱ्या फेरीत धडक मारली. त्याआधी विजेती ऋतुपर्णा दासनेही महिला एकेरीत विजयी सलामी दिली.
चतुर्थ मानांकित सिंधूने कोरियाच्या किम हयो मिन्ह हिच्यावर 21-16, 21-14 असा 49 मिनिटांच्या झुंजीनंतर विजय मिळविताना महिला दुहेरीची दुसरी फेरी गाठली. तसेच साई प्रणीथनेही हॉंगकॉंगच्या वेई नानचे आव्हान 21-18, 21-17 असे 48 मिनिटांच्या लढतीनंतचर संपुष्टात आणताना पुरुष एकेरीची दुसरी फेरी गाठली.

प्रणव चोप्रा आणि सिक्‍की रेड्डी या 15व्या मानांकित जोडीने भारताची प्राजक्‍ता सावंत आणि मलेशियाचा योगेंद्रन कृष्णन या जोडीवर 21-12, 21-19 अशी मात करताना मिश्र दुहेरीत विजयी सलामी दिली. मात्र सुमीत रेड्डी व अश्‍विनी पोनप्पा या सय्यद मोदी ग्रां प्री स्पर्धेतील उपविजेत्या जोडीला वांग लिल्यू व हुआंग डोंगपिंग या 13व्या मानांकित चिनी जोडीकडून 17-21, 21-18, 5-21 असा पराभव पत्करावा लागला. तसेच सात्विकसाईराज रॅंकिरेड्डी व व मनीषा या जोडीलाही मिश्र दुहेरीत पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

चिंता वाढली! देशात कोरोनाबाधितांची संख्या ९३५

चिंता वाढली! देशात कोरोनाबाधितांची संख्या ९३५
देशात कोरोनाने दोन जणांचा बळी गेल्याने मृतांची संख्या 19 झाली आहे २०० हून अधिक रुग्ण ...

आज मुंबई ते नागपूर पावसाची शक्यता

आज मुंबई ते नागपूर पावसाची शक्यता
महाराष्ट्रात अद्यापही केव्हाही पाऊस पडत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. आज, २९ मार्च ...

करोनाशी लढण्यासाठी टाटा ग्रुपकडून आजवरची सर्वात मोठी मदत ...

करोनाशी लढण्यासाठी टाटा ग्रुपकडून आजवरची सर्वात मोठी मदत जाहीर
कोरोनाशी लढा देण्यासाठी उद्योग जगताकडूनही मोठा आर्थिक हातभार लागत आहे. काही कलाकारांनीही ...

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना टेस्ट शक्य

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना टेस्ट शक्य
येत्या आठवड्यापासून औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना टेस्ट ची सोय उपलब्ध असणार आहे. ...

देशात अशी सुरु आहे कोरोनाचा सामना करण्यासाठीची तयारी

देशात अशी सुरु आहे कोरोनाचा सामना करण्यासाठीची तयारी
सध्या भारतात कोरोनाचे संकट गडद होऊ लागले आहे. शनिवारी देशभरात एकूण कोरोनाग्रस्त रुग्नांची ...