मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 7 मे 2018 (12:08 IST)

सायना आणि सिंधू मौल्यवान हिरे : गोपीचंद

भारताच्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल या दोन माझ्या शिष्या असून त्यांनी मोठे यश मिळविले आहे व या दोघी मौल्यवान हिरे आहेत, या शब्दात त्यांचे प्रशिक्षक पी. गोपीचंद यांनी कौतुक केले आहे.
 
मागील महिन्यात सायनाने तिचे वैयक्तिक दुसरे राष्ट्रकुलचे सुवर्णपदक मिळविले. तिने जगात तिसर्‍या स्थानावर असलेल्या सिंधूचाच अंतिमफेरीत 21-18, 23-21 असा पराभव करून गोल्ड कोस्ट येथे महिला एकेरीचे विजेतेपद मिळविले.
 
प्रशिक्षक म्हणून मी या दोघींनाही माझे हिरे समजतो. जिंकणे अथवा हरणे हे माझ्या अ‍ॅकॅडीमध्ये दररोजच घडते. जिंकणे किंवा पराभवामुळे त्या-त्या खेळाडूला एक प्रकारचे प्रोत्साहन मिळते व हे खेळाडू त्यांच्या खेळाचा दर्जा उंचावण्याचा पप्रत्न करतात, असे ते म्हणाले. गोल्ड कोस्ट स्पर्धा जिंकल्यामुळे सायना जगात 12व्या स्थानी पोहोचली. तिने सिंधूविरुध्द पाचव्या सामन्यात चौथा विजय मिळविला.