रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 डिसेंबर 2018 (16:44 IST)

बाप्परे, रस्सीखेच खेळ खेळताना विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुंबईतील विद्याविहारच्या सोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच खेळ खेळताना जीबीन सनी (२२) या विद्यार्थाचा मृत्यू झाला आहे. मृत विद्यार्थाला शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. 
 
ठाणे येथील वागळे इस्टेट परिसरात राहणारा जीबीन सनी हा महाविद्यालयीन खेळात सहभागी झाला होता. रस्सी खेच सुरू असताना जीबीन याने सर्वांच्या पुढे उभे राहत आपली टाकत लावली आणि रस्सी खेचसाठी असलेला दोरखंड ही आपल्या खांद्यावर घेतला. काही क्षणात खांद्यावर भर घेतल्याने जीबीन खाली कोसळला. त्यानंतर त्वरित कॉलेजच्या सुरक्षारक्षकांनी त्याला राजावाडी रुग्णालयात आणले. मात्र, त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.