सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 13 डिसेंबर 2018 (16:28 IST)

सतत जाड म्हणून पत्नीचा छळ, नवरयावर दाखल झाला गुन्हा

बीकेसीमध्ये राहणाऱ्या एका तरुणीचा विवाह आई वडिलांच्या पसंतीच्या मुलाशी झाला होता. हा मुलगा लग्नाच्या पहिल्याच दिवसापासून मुलीला ‘जाडी’ म्हणून चिडवत असे, तो तिला जेव्हा तेव्हा तिच्या जाडेपणावरुन तो हिणवत होता. मुलीच्या घरच्यांनी लग्नाचा सगळा खर्च केला होता. तर  शिवाय मुलीला १८ लाख रुपयांचे दागिने देखील दिले होते. हे सर्व देवून सुद्धा नवरा या तरुणीला तिच्या जाडेपणावरुन चिडवायचा व त्रास देत असे  असा आरोप पत्नीने केला आहे. तरुणीला जाडेपणावरुन चिडवल्यामुळे या दोघांमध्ये सतत जोरदार भांडणे होत होती. हा मुलगा तिला सतत ‘तुझ्यासारख्या जाड मुलीशी कोणीही लग्न केले नसते पण मी केले’. जर तुला संसार टिकवायचा असेल तर तुझ्या माहेराहून १० लाख रुपये आणि कार मला आणून दे’, या प्रकारे तिला त्रास देत होता. शेवटी कंटाळलेल्या तरुणीने तिच्या घरी सगळा प्रकार सांगितला. तो सतत जाडेपणावरुन अपमान करतो हे देखील सांगितले आणि तिने पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी तिची तक्रार नोंदवली असून पोलीस सध्या या घटनेचा अधिक तपास करत आहेत.