मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 12 डिसेंबर 2018 (09:16 IST)

भाजपच्या जुलमी राजवटीला दिलेली चपराक आहे - राज ठाकरे

‘'पाच राज्‍यांच्या निवडणूक निकालाअंती भाजपला त्‍यांची जागा दाखवून दिली आहे. या बद्दल या पाचही राज्‍यातील जनतेचे मी मनापासून अभिनंदन करतो. आजचा निकाल म्‍हणजे भाजपच्या जुलमी राजवटीला दिलेली चपराक आहे आणि भाजपच्या २०१९ च्या लोकासभा निवडणुकांच्या पराभवाची ही नांदी आहे. देशातील जनता यापुढे भाजपला मतदान करणार नाही. देशातल्‍या लोकांना थापा ऐकायचा कंटाळा आला आहे ’’या शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. 
 
राज ठाकरे म्‍हणाले, ‘‘आधी गुजरात निवडणुकांच्या वेळी आणि पुढे कर्नाटक निवडणुका आणि आजच्या निवडणुकांच्या निकालाकडे पाहिले तर एक मान्य करावे लागेल की, राहुल गांधी एकटेच लढत होते आणि त्‍यामुळे आजच्या विजयाचं श्रेय त्‍यांनाच द्यायला हवे.’’ 
 
‘‘मोदींना पर्याय कोण, याचा विचार करू नका. १२५ कोटींच्या देशात मोदींना पर्याय नक्कीच सापडणार आहे. राम मंदिराचा मुद्दा पुढे आणून लोकांच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, जनता सुज्ञ आहे. ती पुन्हा फसणार नाही. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल विचारले असता, 'भाजप आता राहुल गांधी यांना पप्पू म्हणण्याचे धाडस करणार नाही. पप्पू आता परमपूज्य झालेत' अशी टिपण्णीही राज यांनी यावेळी केली.