मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 12 डिसेंबर 2018 (09:11 IST)

उद्धव ठाकरे यांनी केले मतदारांचे अभिनंदन

''नको असलेल्यांना मतदारांनी नाकारले. पर्याय कोण या प्रश्नात गुंतून न पडता नको असलेल्यांना नाकारणाऱ्या मतदारांचे मी अभिनंदन करतो,'' अशा शब्दात विधानसभा निवडणुकीत लागलेल्या निकालांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले. 
 
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत लागलेल्या निकालांबाबत प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले की,  निवडणुकीत हार जीत तर होतच असते. जिंकतो त्याचे अभिनंदन होत असते. पण या चार राज्यात परिवर्तन घडवणाऱ्या मतदारांचे मी अभिनंदन करतो. त्यांनी इव्हीएम, पैसेवाटप, गुंडगिरी आणि पर्याय कोण? या प्रश्नांमध्ये अडकून न पडता जे नको आहेत, त्यांना नाकारले. मतदारांच्या या धाडसाने देशाला दाखवलेली ही दिशा आहे'' असे सांगितले आहे.