मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 12 डिसेंबर 2018 (16:44 IST)

व्हॉट्सअॅप ग्रुपमधून ओळख : अश्लील व्हिडिओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी देऊन बलात्कार

व्हॉट्सअॅपच्या ग्रुपमध्ये अनोळखी व्यक्तीने तुम्हाला पर्सनल चॅटवर बोलण्याचा प्रयत्न केला तर सावधान. यातून मोठा अनर्थ होऊ शकतो. ण पिंपरी-चिंचवड मधील हिंजवडी परिसरात एका व्हॉट्सअॅप ग्रुपमधून ओळख झालेल्या विवाहित व्यक्तीने विवाहित महिलेचा अश्लील व्हिडिओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी देऊन बलात्कार केला आहे. पीडित ३९ वर्षीय महिलेने हिंजवडी पोलिसात तक्रार नोंदवली असून ती सात महिन्याची गरोदर आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई येथील रहिवासी आरोपी साईनाथ शेट्टी (वय – ४४, रा-थेरगाव, मूळचा अंधेरी,) आणि पीडित ३९ वर्षीय महिला हे दोघेही श्वान प्रेमी आहेत. त्याच्या प्रमाणे त्यांचा व्हाट्सऍप ग्रुप आहे. दोघांची ओळख ही व्हॉट्सअॅपमुळे झाली होती. त्यां दोघांनी मग पर्सनल चॅटिंगवर बोलने सुरु केले. त्या दोघांचे चॅटिंग वाढत गेले, आरोपीने मला तुमच्याशी भेटून बोलायचे आहे, असं म्हणून एका हॉटलेवर पीडित महिलेला बोलवत, तिच्याशी जबरदस्ती करत बलात्कार केला होता. या सर्व प्रकाराचे व्हिडिओ चित्रण त्याने केले. आणि ती क्लिप पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी महिलेला दिली. घाबरलेल्या पीडित महिलेला पर्याय नव्हता आरोपी साईनाथकडे अश्लील व्हिडिओ होते. आरोपी बोलवेल त्या ठिकाणी महिलेला जात होती. सर्व प्रकार मागील एक ते दीड वर्षांपासून सुरू होता. यात पीडित महिलेचा विवाह झालेला असून तिला १५ आणि ८ वर्षाची मुले आहेत. त्यामुळे महिला चांगलीच घाबरली होती. पोलिसांना ही सर्व हगिगत तिने सागितली असून पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. आरोपी हा फरार असून त्याचा शोध हिंजवडी पोलीस घेत आहेत.