श्रतीकांता दास रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर
ऊर्जित पटेल यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर माजी आर्थिक सल्लागार आणि वित्त आयोगाचे सदस्य श्रतीकांता दास यांची आरबीआय गव्हर्नरपदी नियु्रती करण्यात आली आहे.
पटेल यांची 2016 साली आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी, मोदींचे समर्थक म्हणून त्यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. मात्र, सप्टेंबर 2019 पर्यंत कार्यकाळ असतानाही पटेल यांनी राजीनामा दिला. पटेल यांच्या राजीनाम्याकडे राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे.