बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 11 डिसेंबर 2018 (07:52 IST)

राजकीय वर्तुळात खळबळ : आरबीआय गवर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा

भाजपा सरकारला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. आता आपल्या देशाची बँकांची बँक व देशाची आर्थिक घडी ठरवणारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनामा दिला आहे. त्यामुळे देशाच्या  राजकीय वर्तुळातही जोरदार खळबळ उडाली आहे. सोबत भाजपा नीती आणि त्या पार्श्वभूमीवर अनेक संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. हा राजीनामा देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी, आरबीआयसाठी आणि सरकारसाठी नुकसानदायक असल्याचे भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी स्पष्ट केले आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उर्जित पटेल यांची कमतरता सातत्याने जाणवेल, असे स्वामी यांनी  म्हटले आहे. 
 
उर्जित पटेल यांच्या तडकाफडकी राजीनाम्याने देशातील बँकींग क्षेत्राला मोठा धक्का मानले जातो आहे. रघुराम राजन यांच्या नंतर आता धक्का सत्तधारी भाजपला बसला आहे. अनेक दिवसांपासून उर्जित पटेल मोदी सरकारच्या दडपणाखाली  होते.  आज त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बँकेतील सुत्रानुसार, पटेल ऑफिसला आले तेव्हापासूनच फार  शांत होते, दुपार नंतर राजीनामा देत ते निघून गेले होते. पटेल यांच्या राजीनाम्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या  असून, त्यांच्या सोबत  काम करणं ही माझ्यासाठी आनंददायक गोष्ट होती. . त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा." असंही ते पुढे म्हणाले.