सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

सीएनजी भरणे झाले सोपे, घ्या बाईल अॅप्लिकेशनची मदत

सीएनजी भरणे ही एकच समस्या नसते तर त्यामुळे आसपासच्या भागात वाहतूक कोंडीही दिसून येते. याच्यावरच उपाय म्हणून 'महानगर गॅस लिमिटेड'ने एक नवीन युक्ती शोधून काढलीय.  बाईल अॅप्लिकेशन किंवा एसएमएसच्या माध्यमातून  बुकींग करता येणार आहे.  MGL e-tokken या मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे  बुकींग करू शकाल. हे अॅप  प्ले-स्टोअरद्वारे डाऊनलोड करता येईल. सोबतच  एसएमएसच्या माध्यमातून बुकिंग करण्यासाठी ८४२२८०२२८० नंबरवर मॅसेज करावे लागणार आहे. 
 
या App आणि SMS मध्ये खालील माहिती देणं गरजेचं आहे. 
 
१) CNG स्टेशन कोड (जो तीन अंकाचा असेल)
 
२) त्यानंतर  तीन चाकी गाडी असेल तर ३ आणि चार चाकी गाडी असेल तर ४ हा अंक लिहावा लागेल 
 
३) गाडी नंबरचे शेवटचे 4 अंक द्यावे लागतील
 
४) वेळ ताशी फॉर्मेटमध्ये लिहिणे आवश्यक आहे
 
बुकिंग केल्यानंतर अॅपद्वारेटोकन दिलं जाईल. टोकन मिळाल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत सीएनजी भरता येईल. याचे स्लॅाट सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहे. सध्या या सुविधा प्रायोगिक तत्वावर मुंबईतील ताडदेव, सायन आणि देवनार या भागात सुरु केल्या आहेत.