शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 5 डिसेंबर 2018 (08:44 IST)

सोन्याच्या दरात कमालीची घसरण

गेल्या दहा दिवसात सोन्याच्या दरामध्ये १६०० रुपयांची घट झालीय. दिवाळीच्या आधीच ३२ हजार ८०० रुपयांच्या घरात पोहचलेलं सोनं ३१ हजारावर येऊन ठेपलंय. मुंबईतल्या सोन्याचा दरचा ३० हजार ८०० रुपये होता. दिवाळीच्या निमित्तानं सराफ बाजारात मोठी उलाढाल झाली. राज्यभरात दुष्काळाचं सावट असंल, तरी सोनं खरेदीचा उत्साह होता. दिवाळीनंतर येऊ घातलेल्या लग्नसराईसाठीही आठवडाभर बाजारात चांगली उभारी होती. 
 
दरम्यान रुपया आणि डॉलरच्या किंमतीमधील चढ-उताराचाही सोन्याच्या बाजारावर परिणाम होत असतो. दरम्यान काल अचानक सोन्याच्या दरात आठशे रुपयांची वाढही नोंदवण्यात आलीय.