मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018 (08:46 IST)

जीएसटीमुळे पतंजली आयुर्वेदच्या विक्रीत घसरणी

पतंजली आयुर्वेदच्या विक्रीला मागील ५ वर्षांत पहिल्यांदाच घट झाली आहे. वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) आणि सदोष वितरण व्यवस्थेमुळे कंपनीच्या विक्रीत घट झाली आहे. केअर रेटिंग्जच्या एका अहवालाच्या मते, कंपनीचा ग्राहक वस्तू महसूल आर्थिक वर्षाअखेर मार्च २०१८ मध्ये १० टक्क्यांहून अधिक घसरणीसह ८१४८ कोटींवर पोहोचला होता.
 
अहवालात म्हटले आहे की, पतंजली आयुर्वेदच्या विक्रीत घसरणीमागचे मुख्य कारण हे जीएसटीच्या अंमलबजावणी आलेली अडचण आणि सदोष वितरण व्यवस्था आहे. कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा यांनी कंपनीची उलाढाल येत्या ३ ते ५ वर्षांत २० हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याची इच्छा व्यक्त केली होती. पतंजलीचा महसूल २०१६ मध्ये १० हजार कोटींपर्यंत पोहोचला होता. विशेष म्हणजे २०१२ मध्ये हा ५०० कोटी रुपयांहून कमी होता.