शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. फेंगशुई
  3. फेंगशुई सल्ला
Written By

हात हालवत असलेली लकी कॅट कश्या प्रकारे करते मदत...

फेंगशुई शास्त्राप्रमाणे घरात लकी कॅट घर ठेवल्याने सुख-शांती, समृद्धी येते. कॅटचा हालत असलेला हात म्हणजे धनात वृद्धी आणि संकटापासून रक्षा. 

मुलांच्या अभ्यासत मदत करते. 
 
ही लकी कॅट मानकी निको आहे. ही मनी कॅट नावाने देखील प्रसिद्ध आहे. जपानमध्ये यामागील एक कथा आहे. या कथेप्रमाणे एकदा धन देवता कुठेतरी जात असताना अचानक पाऊस पडू लागला. पावसापासून वाचण्यासाठी देव एका झाडाखाली जाऊन उभे राहिले. तेवढ्यात त्यांना दिसले की कोपर्‍यात बसलेली कॅट त्यांना हात दाखवत बोलवत आहे. देव तिथे पोहचले आणि मागे वळून बघितले कर वीज पडल्यामुळे झाड तुटून गेले होते. परंतू कॅटमुळे देव सुरक्षित वाचले. प्रसन्न होऊन त्यांनी मांजराच्या मालकाला धनवान केले. काही काळानंतर मांजराचा मृत्यू झाला. मालकाने मांजर दफन करुन प्रतीक स्वरुप मानकी निको नावाची हात हालवणारी मूर्ती तयार केली. तेव्हा पासून संकटांपासून बचावासाठी आणि आर्थिक समृद्धीसाठी लकी कॅट घरात ठेवू लागले.
 
लकी कॅट अनेक रंगात उपलब्ध असते. रंगानुसार याचे फळ देखील भिन्न आहेत.
 
घरात सुख- समृद्धीसाठी सोनेरी कॅट मुख्य हॉलमध्ये.
व्यवसायात आर्थिक प्रगतीसाठी ऑफिस किंवा दुकानात पिवळ्या किंवा पांढर्‍या रंगाची कॅट.
कोणाचीही दृष्ट लागू नये म्हणून निळ्या रंगाची कॅट. 
आरोग्य सुधारण्यासाठी हिरव्या रंगाची कॅट.
प्रेमात यश मिळावे यासाठी लाल रंगाची कॅट.