1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
  4. Gudi Padwa Special Saffron Cardamom Shrikhand

गुढीपाडव्याचा सर्वात लोकप्रिय बेत म्हणजे श्रीखंड मग ट्राय करा Kesar Elaichi Shrikhand Recipe

गुढीपाडव्याचा सर्वात लोकप्रिय बेत म्हणजे श्रीखंड आणि गरम गरम पुऱ्या होय. तसेच या गुढीपाडव्याला तुम्ही केशर विलायची श्रीखंड रेसिपी नक्कीच बनवून पहा. 
 
साहित्य-
१ किलो चक्का (टांगून ठेवलेले दही), पाऊण किलो पिठीसाखर, १ चमचा वेलची पूड, केशर (दुधात भिजवलेले), चारोळी आणि बदाम-पिस्त्याचे काप.
 
कृती-
एका मोठ्या भांड्यात चक्का घेऊन तो मऊ होईपर्यंत फेटून घ्या.
त्यात पिठीसाखर घालून पुन्हा फेटून घ्या (गुठळ्या राहू देऊ नका).
आता त्यात वेलची पूड आणि केशराचे दूध घालून नीट मिसळा.
वरतून सुका मेव्याचे काप घालून थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा.
तयार केशर विलायची श्रीखंड नैवेद्यात नक्कीच ठेवा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
Gudi Padwa 2026 Essay in Marathi गुढीपाडवा निबंध मराठी