हुश्श, राखी आणि गणेशमूर्तींना जीएसटीतून वगळले
राखी आणि गणेशमूर्तींना जीएसटीतून वगळण्यात आल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे. रक्षाबंधन आणि गणेशोत्सव हा परंपरेचा हिस्सा आहे. त्यामुळे या परंपरांचा सन्मान करायलाच हवा. त्यामुळे राखी, गणेशमूर्ती, हस्तशिल्प, हातमागाच्या वस्तू आदींना जीएसटीमधून वगळण्यात येत असल्याचे पीयूष गोयल यांनी सांगितले. गणेशोत्सव आणि रक्षाबंधनच्या काळात लोक मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. त्यामुळे या दोन्ही सणांशी संबंधित वस्तूंना जीएसटीतून वगळण्यात आल्याने लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.