मध्य अमेरिकन देश भयानक भूकंपाने हादरला, पॅसिफिक महासागरात जोरदार खळबळ
मध्य अमेरिकन देश शनिवारी ६.० रिश्टर स्केलच्या भयानक भूकंपाने हादरला. यामुळे पॅसिफिक महासागरात मोठी खळबळ उडाली. शनिवारी सकाळी ग्वाटेमाला आणि एल साल्वाडोरच्या किनाऱ्याजवळ पॅसिफिक महासागरात मोठा भूकंप झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी ६.० रिश्टर स्केलच्या भयानक भूकंपाने मध्य अमेरिकन देश हादरला. यामुळे पॅसिफिक महासागरात मोठी खळबळ उडाली. शनिवारी सकाळी ग्वाटेमाला आणि एल साल्वाडोरच्या किनाऱ्याजवळ पॅसिफिक महासागरात मोठा भूकंप झाल्याचे सांगण्यात येत आहे.
अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, शनिवारी पहाटे ४:१४ वाजता हा भूकंप झाला. या भूकंपाचे केंद्र १० किलोमीटर खोलीवर होते. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.० नोंदवण्यात आली. त्याचा केंद्रबिंदू एल साल्वाडोरमधील अकाजुटला शहरापासून ८१ किलोमीटर नैऋत्येस आणि ग्वाटेमालामधील प्वेर्टो सॅन होजेपासून १०७ किलोमीटर नैऋत्येस होता.
Edited By- Dhanashri Naik