बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 डिसेंबर 2018 (11:08 IST)

सॅमसंग गॅलॅक्सी ए9 अप्रतिम फोटो क्लिक करतो

फोनमध्ये कॅमेराची सुरुवात व्हीजीए (व्हिडिओ ग्राफी अॅरे) ने झाली. मग मेगापिक्सेल, त्यानंतर ड्युअल रीअर कॅमेरा पुन्हा तीन कॅमेरा आहे आणि आता हा तंत्रज्ञान चार कॅमेरा वर आला आहे. सॅमसंग गॅलॅक्सी ए 9 चार कॅमेरेसह आला आहे. दिसण्यात हा एक सुंदर फोन आहे. मागील पॅनलवर कंपनीने विशेष प्रकारच्या काचेचा वापर केला आहे, जो सौंदर्य वाढवण्यासह मजबूती देखील देतो आणि पडल्यानंतर यात काहीच नुकसान होत नाही.
 
* कॅमेरा :-
गॅलॅक्सी ए9 मध्ये 24 मेगापिक्सल + 5 मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर, 2 पट ऑप्टिकल झूमसह 10 मेगापिक्सेल आणि 8 मेगापिक्सेलचे अल्ट्रा-वाईड सेंसर देण्यात आले आहे. या फोनवरून घेतलेला फोटो एक सुंदर अनुभव देतो. कमी किंवा जास्त प्रकाश दोन्ही परिस्थितींमध्ये एक चांगला फोटो आपल्याला मिळतो. त्यातून घेतलेले फोटो रंगाला अजून सुधारतात. लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे, 24-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा सीन ऑप्टिमायझर मोडमधील आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर 19 दृश्यांना ओळखण्यासाठी करतो. याशिवाय, गॅलॅक्सी ए9 मध्ये बोके मोडसाठी डेप्थ सेन्सर आहे. यासह, फोटो काढल्यानंतर देखील पार्श्वभूमी अस्पष्ट केली जाऊ शकते. सेल्फीच्या चाहत्यांसाठी, कंपनीने फोनमध्ये 24 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा दिला आहे जो फेस अनलॉकच कार्य देखील करतो.
 
* बीनं नॉचचा फुल व्ह्यू डिस्प्ले :-
फोनमध्ये पुढील 6.3-इंच सुपर अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याला सॅमसंग इन्फिनिटी डिस्प्ले म्हटले गेले आहे. फोनमध्ये पुढील बाजू पूर्णपणे डिस्प्लेने कॅप्चर केली आहे आणि त्यात कोणत्याही प्रकाराची नॉच नाही आहे. हँडसेटमध्ये 3 डी कर्व्ड ग्लास आणि मेटल फ्रेम आहे. पूर्णपणे सांगायचे म्हणजे गॅलॅक्सी ए9 (2018) प्रिमियम दिसते आणि हातात सोयीस्कर आहे. फोनमधील पॉवर आणि व्हॉल्यूम बटणे उजवीकडे दिलेले आहे. गॅलॅक्सी ए9 (2018) मध्ये डाव्या बाजूला एक बिक्सबी बटण आहे. ज्यामध्ये सॅमसंगचा व्हॉईस सहाय्यक सक्रिय करता येईल. गॅलॅक्सी ए9 मध्ये मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर दिलेला आहे आणि याच्या वापरात काहीच त्रास येत नाही. गॅलॅक्सी ए9 मध्ये क्वेलकॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर देण्यात आला आहे. 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज वेरिएंटमध्ये 6 जीबी रॅम उपलब्ध आहे.