सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

'वेबदुनिया'च्या यशात भर पडली

'यात काही खास आहे' हो खरंय वेबदुनिया मराठीत काही खास आहे आणि वेबदुनियाचे वाचक आणि प्रेक्षक खूपच खास आहे कारण आपणच आम्हाला अर्थातच वेबदुनियाला एक नवीन रुपेरी टप्प्यापर्यंत पोहचण्याची संधी दिली आहे. आपल्याला ही खुशखबरी देताना आम्हाला अत्यंत प्रसन्नता वाटते की वेबदुनिया मराठी यूट्यूब चॅनलला सिल्वर प्ले बटण अवॉर्ड ने पुरस्कृत करण्यात आले आहे.
 
अत्यंत कमी काळात 100K + सब्सक्राइबर्स जोडणे आणि व्हिडिओला एक मिलियनहून अधिक व्यूज मिळणे अभिमानाची बाब आहे. हे शक्य झालं ते निश्चितच आपल्याला स्नेह, सहयोग आणि विश्वासमुळे. आमच्या या यशाचे आपण शत-प्रतिशत सहयोगी आहात. आम्हाला नेहमी आपला हा सहयोग मिळत राहील असा विश्वास आहे. एकदा पुन्हा या रुपेरी यशासाठी आम्ही आपले आभारी आहोत. आमच्यासोबत असेच जुळलेले राहा...