शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

शपथग्रहणाच्या आनंदात काँग्रेसला धक्का,शीखदंगली प्रकरणी सज्जन कुमार दोषी

दिल्ली हायकोर्टाने सोमवारी काँग्रेस नेता सज्जन कुमारला 1984 मधील शीखदंगली प्रकरणी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
 
हायकोर्टाने सज्जन कुमारला दोषी ठरवले असून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सज्जन कुमारला ३१ डिसेंबरपर्यंत पोलिसांपुढे शरण येण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यापूर्वी दिल्ली सोडून न जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
१९८४ च्या शीखविरोधी दंगलीत हत्या आणि दंगलीचे गुन्हे दाखल असलेल्या काँग्रेस नेता सज्जन कुमारला कनिष्ठ न्यायालयाने दोषमुक्त केले होते. या सुटकेला दिल्ली हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. 
 
सज्जन कुमारसह कॅप्टन भागमल, गिरीधारी लाल आणि काँग्रेसचा माजी नगरसेवक बलवान खोखार या तिघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर किशन खोखार आणि महेंद्र यादव या दोघांना १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.