सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

सात वर्षाच्या चिमुरड्याने खेळण्याच्या वयात वर्षभरात 22 मिलियन डॉलर कमावले

सोशल मीडियावर केवळ मनोरंजन आणि ब्रांडिंगच नव्हे तर कमाईचा उत्तम माध्यम आहे. सोशल मीडियाच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मामुळे अनेक लोकं स्टार्स बनले आणि अनेकांनी खूप कमाई देखील केली. 
 
त्यातूनच समोर आलेलं एक आश्चर्य म्हणजे रियान. सात वर्षाचा रियान यूट्यूबवर सर्वात कमी वयाचा आणि सर्वात कमावू सुपरस्टार झाला आहे. रियानची मिळकत बघून आपण हैराण व्हाल. खरंतरं कोट्यधीश झाल्यामुळे रियान पुन्हा चर्चेत आला आहे. यूट्यूबच्या या सर्वात लहान कोट्यधीशाचं नाव तेव्हा समोर आले होते जेव्हा प्रसिद्ध फोर्ब्स मॅगझीनने त्याला सर्वात अधिक कमाई करणार्‍या यूट्यूब यादीत सामील केले होते.
 
रियान यूट्यूबवर टॉय रिव्यू करतो. सात वर्षाच्या रियानने या वर्षी 22 मिलियन डॉलर कमाई केली आहे. फोर्ब्स मॅगझिनच्या टॉप 10 कमाई करणार्‍या यूट्यूबरच्या यादीत रियानचे नाव टॉपवर आहे.
 
Ryans Toys Review यूट्यूब चॅनलद्वारे रियान तीन वर्षांपासून खेळणींबद्दल माहिती देतो. त्याचे एक कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याच्या प्रत्येक व्हिडिओला मिलियन्समध्ये व्यूज आहे. त्यात खेळणीबद्दल संपूर्ण माहिती दिलेली असते. 
 
यूट्यूब बघण्याच्या शौकिन रियानने जेव्हा आईला विचारले की मी यावर का नाही तेव्हा त्याच्या नावाने चॅनल ओपन करण्याचा विचार आला. आणि आता तो इतका प्रसिद्ध झाला आहे की आता त्याची स्वत:ची टॉय लाइन लाँच केली गेली आहे. रियानच्या या लाइनमध्ये वेगवेगळ्या प्रकाराचे अनेक टॉयज भरलेले आहेत.