मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

मृत महिलेच्या गर्भाशयाच्या प्रत्यरोपणातून बाळाचा जन्म

मृत महिलेने दान केलेल्या गर्भाशयाच्या प्रत्यरोपणातून दुसर्‍या महिलेने सुदृढ बालकाला जन्म दिला आहे. जगातील ही पहिलीच ऐतिहासिक घटना ब्राझील येथील साओ पावलो शहरातील आहे. 
लानसेटमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार या प्रत्यरोपणामुळे कधीही आई न बनू शकणार्‍या महिलेने मुलीला जन्म दिला.
 
या वैद्यकीय इतिहासातील यशामुळे आता हजारो महिलांना आशेचं किरण दिसू लागलं आहे. 
 
एका दुर्मिळ आजारामुळे 32 वर्षीय या महिलेने जन्मतः गर्भाशय नव्हते. स्ट्रोकमुळे निधन झालेल्या एका 45 वर्षीय महिलेने त्यासाठी तिचे गर्भाशय दान केले. डिसेंबर 2017 मध्ये गर्भाशय प्रत्यारोपित करण्यात आले होते. गर्भाशय प्रत्यारोपण झाल्यावर त्या महिलेचं शरीर नवीन अवयव स्वीकारत आहे की नाही हे पाहण्यासाठी पाच महिन्यांचा कालावधी गेला. त्यानंतर डॉक्टरांच्या देखरेखीमध्ये योग्य उपचारानंतर त्या महिलेने एका मुलीला जन्म दिला.