पायलटला झोप लागली, विमान निघाला पुढे
ऑस्ट्रेलियात एका विमान चालकाला विमान उडवत असताना झोप लागली आणि गंतव्यहून 29 किमी पुढे निघून गेला. पायलट मालवाहक विमान उडवत होता आणि या दरम्यान अशी घटना घडली. पायलट विरुद्ध चौकशीचे आदेश दिले गेले आहे.
पाइपर पीए-31 नावाजो चीफटेन नावाच्या या विमानात केवळ एक पायलट होता. त्याने तस्मानिया येथील डेवनपोर्ट शहरापासून बास स्ट्रेटच्या किंग द्वीपासाठी उड्डाण भरली. ऑटोपायलट सिस्टम ऑन करून तो झोपून गेला. ही घटना एक महिन्यापूर्वीची आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोल विमानात पायलटशी संपर्क साधण्यात फेल झाल्यावर ही घटना उघडकीस आली.