1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

अहो आश्चर्यम, महिलेने चक्क 21 मुलांना दिला जन्म

इंग्लंडमधील एका महिलेने चक्क 21 व्या मुलाला जन्म दिला आहे. शु रेडफोर्ट असे या महिलेचे नाव असून तिचे वय 42 वर्ष आहे. तिने वयाच्या 14 व्या वर्षी पहिल्या मुलीला जन्म दिला होता.

शु रेडफोर्ट आणि तिचा पती निओल यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. या नव्या पाहुण्याबरोबरच आता त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या 23 झाली आहे. नव्या पाहुण्याच्या आगमनाने घरातील सर्व बच्चेकंपनी आनंदीत आहेत.

प्रसूतीनंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना पुढच्या वर्षी पुन्हा प्रसूतीसाठी येणार का असे विचारल्यावर ‘आता पुरे ही शेवटची वेळ’ असे या महिलेने सांगितले. मात्र 20 व्या मुलाच्या जन्मावेळीही रेडफोर्ट यांनी असेच उत्तर दिले होते याची आठवण तेथील कर्मचाऱ्यांनी करून दिली.