पूर्णपणे चॉकलेटने तयार हे घर, आपण देखील राहू शकता एक रात्र
असावा सुंदर एक चॉकलेटचा बंगला... हे गाणं आपण लहानपणी खूप ऐकले आणि मनात अश्या बंगल्याची कल्पनादेखील केली असेल परंतू हे स्वप्न खरं झालं आहे.
सोशल मीडियावर अलीकडे एका घराचे फोटो खूप व्हायरल होत आहे. होणारच.. कारण खूप खास आहे हे घर... विश्वास बसणार नाही परंतू हे घर पूर्णपणे चॉकलेटने तयार केलेले आहे. फ्रान्समध्ये बनलेल्या या घराच्या भिंती आणि छत देखील चॉकलेटने बनलेली आहे. येथील घडी, पुस्तक, पलंग, टेबल, फ्लॉवरपॉट आणि येथील लहान तलावदेखील चॉकलेटने बनला आहे.
एका न्यूज रिपोर्टनुसार हे चॉकलेट कॉटेज प्रसिद्ध आर्टिसन चॉकलेटियर जेन-लुक डीक्लूजेऊ यांनी तयार केले आहे. 200 वर्ग फुटाच्या या शानदार कॉटेजला तयार करण्यासाठी 1.5 टन चॉकलेट वापरण्यात आली आहे. सर्वात विशेष म्हणजे आपण या घरात राहू देखील शकतात. हॉटेल रिझर्वेशन वेबसाइट Booking.com च्या नुसार या कॉटेजमध्ये राहण्यास इच्छुक साईट द्वारे 5 आणि 6 ऑक्टोबरला बुकिंग करवू शकतात.
इंटरनेटवर व्हायरल या कॉटेजचे फोटो बघून लोकं आगळे वेगळे कमेंट्स करत आहे. काही लोकं यावर स्टडी करण्यास इच्छुक असल्यामुळे येथे नाइट स्टे देण्यात येत आहे.