मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

पोट सुटलेल्या 30 पोलिसकर्मार्‍यांना नोटिस

अहमदाबाद- अहमदाबाद येथे पोट सुटलेल्या पोलिसांना नोटिस दिले जात आहे. त्यांना पोट कमी करण्याची ताकीद दिली जात आहे. सोबतच रिपोर्ट पाठवावे हे ही सांगण्यात आले आहे. 
 
संयुक्त पोलिस आयुक्त अशोक यादव यांनी मिशन हेल्थ अंतर्गत दोन ठाण्यांच्या दौरा केला. कागडापीठ ठाण्यात एएसआय, कांस्टेबलसह पाच पोलिस कर्मचाऱ्यांना पोट कमी करण्यासाठी नोटिस देण्यात आले. गोमतीपूर ठाण्यात देखील 25 पोलिस कर्मार्‍यांना नोटिस बजावण्यात आली.
 
सुटलेलं पोट कमी करण्यासाठी ताकीद देणे हे पहिल्यांदा घडले नसून पूर्वी नोव्हेंबर 2017 मध्ये काही मोठे अधिकारी अशी सूचना देऊन चुकले आहे. स्वत: अशोक यादव यांनी सेक्टर-2 च्या 12 ठाण्यात जाऊन एकूण 97 जवान आणि अधिकार्‍यांना पोट व वजन कमी करण्यासाठी नोटिस दिले होते.