शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गुजरातनो स्वाद
Written By

Gujarati Recipe : रस ढोकला

ढोकळ्याचे साहित्य : एक वाटी चण्याची डाळ, चार मिरच्या, बोटभर लांब आले, चार-सहा लसूण-पाकळ्या, मीठ सोडा किंवा पापडखार.

रसाचे साहित्य: एक वाटी खोवलले खोबरे, पाच-सहा ओल्या मिरच्या, दोन चमचे भाजलेल्या दाण्यांचे किंवा तिळाचे कूट, सोडा किंवा पापडखार.
 
फोडणीचे साहित्य : चार चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, कोथिंबीर.
 
कृती : रात्री डाळ धुऊन पाण्यात भिजत घालावी. सकाळी पाणी काढून टाकावे व डाळ बारीक वाटावी. वाटलेली डाळ चार ते सहा तास भिजत ठेवून द्यावी. मिरची, लसूण व आले वाटून घ्यावे, वाटलेल्या डाळीत आले, मिरची, लसूण, चवीप्रमाणे मीठ साखर व पाव चमचा हळद घालून, सर्व मिश्रण एकसारखे कालवावे. अर्धा चमचा सोडा थोड्या पाण्यात विरघळवून घेऊन, तो डाळीच्या पिठात घालून, ते एकसारखे कालवावे. थाळ्याला तेलाचा हात पुसून, त्यात चण्याच्या पिठाचे मिश्रण पसरून घालावे व वाफेवर उकडून घ्यावे. कुकरामध्ये पाणी घालून, त्यावर थोड्या उंचीवर थाळ ठेवून, दहा-बारा मिनिटे वाफवावे. वाफवून झाल्यावर वड्या पाडून ठेवाव्या.
 
रसाची कृती : खोबरे, मिरच्या, तिळाचे किंवा दाण्याचे कूट एकत्र वाटून घ्यावे. फोडणी करून त्यात चार ते पाच वाट्या पाणी घालून उकळी आणावी. वाटून ठेवलेले खोबरे-मिरचीचे मिश्रण त्यात घालावे.
 
खावयास देतेवेळी गरम रसात ढोकळ्याच्या वड्या घालाव्यात. मिरचीऐवजी लाल तिखट घातल्यास रसाला लाल रंग येतो व चांगला दिसतो.