बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. थोडं आंबट थोडं तिखट
Written By

टोमॉटोची व चिंचेची चटणी

साहित्य : अर्धा किलो टोमॅटो, 5-7 लसणाच्या पाकळ्या, अर्धीवाटी तेल, चमचाभर मोहरी, आवडीनुसार तिखट व मीठ, थोडासा चिंचेचा गाळलेला कोळ, अर्धा चमचा मेथी दाणा, थोडासा कढीपत्ता व हिंग दोन चमचे साखर.
 
कृती : सर्वप्रथम कढईत तेल घालून हिंग व मेथी परतून घ्या. त्याची पावडर करा. लसूण आणि टोमॅटोही मिक्सरमध्ये घालून त्याची पेस्ट करून घ्या. ती पेस्ट घट्ट होईपर्यंत शिजवा. आता एका कढईत जास्त तेल घालनू त्यावर मोहरी व कढीपत्त्याची फोडणी तयार करा. त्यात चिंचेचा कोळ, हिंग, मेथीची पावडर, मीठ, तिखट घाला. कोळ शिजू लागला की टोमॅटोची पेस्ट व साखर घालून पाच मिनिटे शिजवा.