1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
Written By

शमी कबाब

shami kabab nonveg recipe
साहित्य- 500 ग्रॅम मटन खिमा, 200 ग्रॅम धुतलेली चना डाळ, 2 चमचे तिखट, चवीनुसार मीठ, 1 कांदा, आले, 10-12 लसानाच्या पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या, कोथिंबिर, 1 लहान चमचा जीरे, 5 ते 6 लवंग, तळण्यासाठी तेल किंवा तूप.
 
कृती- कांदा, आले व लसणाच्या पाकळांना सोलून बारीक करून घ्यावे. त्यात चना डाळ, खिमा, मीठ, तिखट, जिरे व लवंग टाकून थोड्या पाण्यात खिमा वाफवावा. शिजलेला खिमा गाळून घ्या. मिक्शर मधून बारीक करून घ्या. 
 
हिरव्या मिरच्या बारीक कापून कोथिंबीरसोबत वाटलेल्या मिश्रणात मिसळावे. त्या मिश्रणाला वड्याचा आकार देऊन तव्यावर तूप किंवा तेल टाकून भाजून घ्यावे. उथळ डिशमध्ये वर्तुळाकारामध्ये शमी कबाब रचून त्यावर टोमॅटो सॉस टाकून सर्व्ह करू शकता.