1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

थायलंड : गुहेत बनवणार बेसकॅम्प, प्रशिक्षण देवून बाहेर काढणार मुले

Thailand cave rescue
thailand caves
थायलंड येतील गुहेत अडकलेल्या १२ मुले एक प्रशिक्षक यांचा प्रश्न अजूनही सुटला नाही. रोज नवीन नवीन उपाय सुचवले जात आहेत. मात्र आता प्रथम या मुलांसाठी  गुहेत बनवणार बेसकॅम्प निर्माण करण्यात येणार आहे. त्यातून त्यांना मानसिक आधार आधी दिला जाणार आहे. 
 
पाणी वाढणार यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे. गुहेच्या बोगद्यांमधून बाहेर पडण्यासाठी या मुलांना पोहण्याचं प्रशिक्षण देण्यात येईल. स्कुबा डायव्हिंग तंत्राच्या माध्यमातून पोहायला शिकवण्यात येईल. असे वृत्त बीबीसी ने दिले आहे. या नुसार या सर्वाना वाचवायचे असेल तर हाच एक पर्याय समोर आहे. 
 
डायव्हिंगच्या माध्यमातून त्यांना सगळ्यांत कमी वेळात बाहेर आणता येऊ शकतं मात्र त्यात धोका जास्त आहे असं अन्मर मिर्झा यांनी सांगितलं. अन्मर हे US Cave रेस्क्यू कमिशनचे राष्ट्रीय समन्वयक आहेत. असे वृत्तात स्पष्ट केले आहे. ही सर्व मुले ९ दिवसांपासून गुहेत अडकली होती. त्यांना शोध घेण्यसाठी जगातून मदत मागितली गेली आहे. या मुलांना सोमवारी शोधले गेले आहे. पूर्ण जागचे लक्ष या मुलांकडे लागले आहे.