शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: जकार्ता , मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018 (11:36 IST)

इंडोनेशियाचे विमान कोसळून 189 प्रवाशांना जलसमाधी

इंडोनेशियाचे लायन एअरवेजचे विमान सोमवारी जकार्ताहून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच समुद्रात कोसळले. या विमानात असलेल्या 189 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती शोध आणि बचाव पथकाने दिली आहे. विमान जेटी- 610 जकार्ताहून पान्गकल पिनांगला जात असताना ही दुर्घटना घडली. लायन एअर बोईंग 737 प्रवासी विमानात कर्मचार्‍यांसह 189 प्रवासी होते. विमानातील सर्वचजण दगावले असण्याची भीती व्यक्त केली जात होती. शोध आणि बचाव पथकाला विमानाचे अवशेष आढळून आले आहेत. या दुखःद घटनेबाबत सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत.
 
विमान सुात्रातील पान्गकल पिनांगला जात असताना उाणाच्या 13 मिनिटानंतर विमानाचा संपर्क तुटला. संपर्क तुटण्यापूर्वी पायलटने विमान परतीचे संकेत दिले होते, असे सांगितले जात आहे. 
 
शोधमोहिमेदरम्यान जावा समुद्रकिनारी विमानाचे अवशेष आढळून आले आहेत. या फ्लाइट क्रमांक 610 मध्ये 3 मुलांसह 181 प्रवासी आणि 8 चालक दलाचे सदस्य होते. प्रवाशांबाबत आप काही माहिती समजू शकलेली नाही.