1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

अमेरिकेत कुत्रे-मांजर मारून खाणे प्रतिबंधित, साडे तीन लाख दंड

US House passes bill to ban eating dogs and cats
फाइल फोटो वॉशिंग्टन। अमेरिकी प्रतिनिधी सभेत पास झालेल्या एका बिलप्रमाणे मनुष्याच्या आहारासाठी कुत्रे आणि मांजर या जनावरांचे वध करण्यावर प्रतिबंध घातला गेला आहे. कुत्रा आणि मांजर मांस व्यापार निषेध कायदा 2018 चे उल्लंघन केल्यास 5000 अमेरिकी डॉलर (3,50,000 हून अधिक रुपये) दंड आकारला जाईल.
 
दुसर्‍या प्रस्तावामध्ये सदनाने चीन, दक्षिण कोरिया आणि भारतासह सर्व देशांमध्ये कुत्रे आणि मांजर मांस व्यापारावर बंदी घालण्याची अपील केली आहे. कांग्रेस सदस्य क्लाउडिया टेनी यांनी म्हटले की कुत्रे आणि मांजर साथीदार आणि मनोरंजनासाठी असतात. दुर्दैवाने, चीनमध्ये दरवर्षी मनुष्याच्या आहारासाठी एक कोटीहून अधिक कुत्रे मारले जातात.
 
त्यांनी म्हटले की यासाठी आमच्या करुणामय समाजात कोणतीही जागा नाही। हे बिल अमेरिकेचे मूल्यांचे प्रतिबिंब असून अमानवीय आणि क्रूर व्यवहाराला साथ नाही असे संदेश देतं.
 
प्रस्तावात चीन, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, थायलंड, फिलीपाइन, इंडोनेशिया, कंबोडिया, लाओस, भारत आणि इतर देशांना हे कायदा अमलात आणावा अशी अपील केली गेली आहे.