मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: इस्लामाबाद , शनिवार, 18 ऑगस्ट 2018 (09:42 IST)

पाकच पंतप्रधानपदाची इम्रान खान घेणार आज शपथ

पीटीआय पक्षाचे प्रुख इ्रान खान हे पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून आज शनिवारी शपथ घेणार आहेत. पाकिस्तानच्या संसदेध्ये पंतप्रधान निवडीसाठी शुक्रवारी झालेल निवडणुकीत इम्रान यांनी पीएएल-एनचे शाहबाझ शरीङ्ख यांचा 176 विरुद्ध 96 तांनी पराभव केला. 
 
पाकिस्तान संसदेच्या सभापतिपदी असद कैसर यांची निवड झाली. कैसर यांनी मतदानाचा निकाल जाहीर करताच संसदेमध्ये विरोधी पक्ष पीएएल-एनच्या सदस्यांनी नांजूर अशा घोषणा देत याचा विरोध केला. सभापतींनी सर्वांना शांत करण्याचा बराच प्रयत्न केला. पण सदस्यांची घोषणाबाजी सुरुच होती. 
 
या दरम्यान इम्रान शांतपणे त्यांच्या जागेवर बसून हसत होते आणि त्यांच्या सहकार्‍यांकडून अभिनंदनाचा स्वीकार करत होते. पीपीपीचे बिलावल भुत्तो झरदारी यांच्या पक्षाने या मतदान प्रक्रियेपासून अलिप्त राहण्याची घोषणाकेली होती. 
 
पीएएल-एन पक्षाचे नेते आयाज सादीक यांनी त्यांना पाठिंबा देण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही.