अखेर या सुंदर देशाला भूकंप, त्सुनामीचा तडाखा भयंकर नुकसान
पर्यटन साठी प्रसिद्ध असलेल्या सुंदर देश इंडोनेशियाला जबर भूकंपामुळे आलेल्या भीषण त्सुनामीचा तडाखा बसला आहे. इंडोनेशियाच्या सुलावेसी द्वीपमध्ये ७.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाला असून, निर्माण झालेल्या त्सुनामीमुळे पालू आणि डोंगाला या शहरांतील अनेक घरे व इमारती उद्ध्वस्त झाल्या आहे. याबाबत इंडोनेशियाच्या जिओफिजिक्स अर्थात भूगोल आणि हवामान विभागाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
जिओफिजिक्सच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे की जबरदस्त ताकतवान भूकंपामुळे समुद्रात ही त्सुनामी निर्माण झाली आहे . याचा सुलावेसी प्रांताची राजधानी असलेल्या पालू आणि डोंगाला शहराला मोठा तडाखा बसला असून मोठे नैसर्गिक हानी झाली आहे. मात्र अजून नुकसान किती आणि किती मृत हे समजत नाहीये. हा सर्व भाग संदेशवहन व दळणवळणाच्या सर्व साधनांशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे याठिकाणची माहिती मिळवण्यात मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत. मदतकार्यासाठी सर्व राष्ट्रीय यंत्रणा कामाला लावण्यात आली आहे.