रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

प्रियकराला मारून त्याची बिर्याणी बनवली, नोकरांना खाऊ घातली

प्रेमात भांडण झाल्यावर लोकं कोणत्याही थराला जातात परंतू येथे घडलेला प्रकार ऐकून अंगाला शहारे येतील. लोकं काय नाही करत परंतू येथे वचपा घेण्याच्या प्रवृत्तीमुळे महिलेने आपल्या प्रियकराचे तुकडे-तुकडे केले. याने तिचे मन भरले नाही तर तिने प्रियकराचे तुकडे तांदूळ आणि मसाला घालून शिजवले. त्याची बिर्याणी तयार केली आणि आपल्या नोकरांना खाऊ घातली.
 
हे प्रकरण संयुक्त अरब अमीरात येथील मोरक्को शहराचे आहे. येथील एका मुलीने आपल्या ब्वॉय फ़्रेंडचे तुकडे केले कारण तो दुसर्‍या मुलीशी लग्न करणार होता. अल-अईन येथे मुलगी आपल्या प्रियकरासोबत मागील सात वर्षांपासून राहत होती. परंतू जेव्हा तिला कळले की तो इतर कुणाशी लग्न करणार आहेत तर तिने त्याचा खून केला आणि तुकडे-तुकडे केले.  
 
घटना तीन महिन्याने समोर आली जेव्हा मृतक दिसत नसल्यामुळे त्याच्या भावाने त्याला शोधायला सुरू केले. तपासणी दरम्यान पोलिसांना महिलेच्या घरी ब्लेंडरमध्ये मानवी दात मिळाले, त्यांचा डीएनए टेस्ट केल्यानंतर ते मृत व्यक्तीच्या दाताशी जुळले.  
 
यानंतर पोलिसांनी महिलेला अटक केली. तिने पोलिसांना सांगितले की ती त्याला आर्थिक मदत करत होती तरी तो धोका देत होता म्हणून रागात येऊन मी त्याचा खून केला.