सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

मेलबर्न कसोटी: मयंक अग्रवाल करणार डेब्यू, मुरली विजय-लोकेश राहुल संघाच्या बाहेर

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नमध्ये बुघवारी होणार्‍या तिसर्‍या कसोटीसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेवनवची घोषणा करण्यात आली आहे. वाईट फार्ममुळे सलामी फलंदाज मुरली विजय आणि लोकेश राहुल यांना संघाच्या बाहेर करण्यात आले आहे. मयंक अग्रवालला या कसोटीत डेब्यू करायची संधी मिळाली आहे. मयंकसोबत मध्यक्रमाचे फलंदाज हमुना विहारीला ओपनिंग करायची संधी मिळाली आहे. दोन्ही संघ चार कसोटीच्या मालिकेत 1-1 वर आहे.
 
पर्थच्या कसोटीत पराभूत झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली म्हणाला होता की विजय आणि राहुल गेल्या काही सामन्यात अयशस्वी ठरले असले तरी टीम मॅनेजमेंट त्यांच्यासोबत आहे. दोघेही आपल्या झालेल्या चुकांहून धडा घेऊन चांगले प्रदर्शन करतील. 
 
विजय आणि राहुल या दोघांमधून एकालाच बाहेर केले जाईल असा अंदाज बांधला जात होता परंतू मॅनेजमेंटने कसोटीच्या या महत्त्वाच्या सामन्यात धोका पत्करणे योग्य नाही असा विचार करत दोघांनाही बाहेरचा रस्ता दाखवला.
 
या व्यतिरिक्त एडिलेड दुखापत झाल्यामुळे पर्थमध्ये खेळू शकले नाही, रोहित शर्मा पण संघात नाही. मात्र जडेजा फिट झाल्यानंतर आता या दोर्‍यातील पहिला सामना खेळतील.