बीसीसीआयमध्ये माजी आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती, अँटी करप्शन युनिटमध्ये करणार काम
बीसीसीआयने आपला भ्रष्टाचार रोधी घटक (एसीयू) मजबूत करण्यासाठी 10 माजी आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्ड पाच क्षेत्रीय प्रमुखांची नेमणूक करणार आणि त्यांच्या खाली पाच इंटिग्रिटी अधिकारी काम करतील, ही माहिती बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
'एसीयू मजबूत करण्यासाठी, राज्य पातळीवरील सक्षम अधिकारी नियुक्त केले जातील. हे पाच क्षेत्रीय प्रमुख 60 ते 65 वर्षे निवृत्त डीजी किंवा आयजी पातळीवरील अधिकारी असतील. इंटिग्रिटी अधिकारी निवृत्त एसपी पातळी अधिकारी असतील.'
गुरुवारी नियुक्तीसाठी मुलाखत घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि सीओएचे अध्यक्ष विनोद राय, सीओए सदस्य डायना एडूलजी, एसीयू प्रमुख अजित सिंह आणि माजी मुंबई पोलिस आयुक्त एएन रोई यांच्या पॅनेलद्वारे मुलाखत घेण्यात येणार आहे.