शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

न्यूज अँकरचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू

नोएडा- येथे सेक्टर-77 मध्ये अंतरिक्ष फॉरेस्ट अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडून एका न्यूज अँकरचा मृत्यू झाला. राधिका कौशिक असे मृत महिलेचे नाव शुक्रवारी पहाटे 3.30 च्या सुमारास ही घटना घडली.
 
त्यावेळी फ्लॅटमध्ये तिच्यासोबत तिचा सह अँकर राहुल अवस्थी उपस्थित होता. राधिकासह आणखी दोन जण फ्लॅटमध्ये राहत असून त्यावेळी ते घरात नव्हते. प्राथमिक तपासणीत राधिका आणि राहुल दोघेही नशेत असल्याचे समोर आले आहे.
 
राधिका मूळची जयपूरची असून एका चॅनलमध्ये काम करण्यासाठी येथे आली होती. तरुणीच्या कुटुंबाने सीनिअर अँकरविरुद्ध हत्येचे प्रकरण नोंदवले आहे. दोघांमध्ये वादावादी सुद्धा झाली होती. राहुल अवस्थीने सांगितले की, राधिका परेशान होती आणि ती दारू पिऊन 3.30 च्या सुमारास बाल्कनीत उभी होती. तेव्हा मी बाथरूममध्ये गेलो होतो, तेवढ्यात राधिका खाली पडली. हा निव्वळ अपघात होता. 
 
आता ही हत्या होती की आत्महत्या ते निश्चित करण्यासाठी पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांप्रमाणे फ्लॅटमध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या असून राहुल देखील नशेत होता. दोघांनी रात्री 12 च्या सुमारास ऑनलाइन डिनर देखील ऑर्डर केले होते. राधिकाच्या वडिलांप्रमाणे त्यांची मुलगी दारूचे सेवन करत नव्हती. तिची प्रगती राहुलला बघवतं नव्हती. आणि त्याने हत्या केली असावी असा संशय घेतला आहे. राहुल अवस्थीची चौकशी करत आहेत.